आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात 5 ते 11 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता:जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण; हवामान विभाग खात्याचा अंदाज

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसातील पावसाच्या खंडानंतर विदर्भात 5 ते 11 ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता सांगितली आहे. यामध्ये 7 व 8 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.

सायंकाळपासून ढगाळ वातावरण

गेल्या आठवडाभरातपासून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेत शिवारांमध्ये वाफसा स्थिती तयार होऊन आंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र पावसाची हुलकावणी बसत आहे. अशातच दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत आहे. अभ्यासकांच्या मते, मान्सूनची ट्रफरेषा सध्या तिच्या सामान्य स्थितीमध्ये आहे. कमी जास्त दाबाचे, पूर्व पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र सध्या दक्षिण भारतावर असुन पुढील 3 ते 4 दिवसात ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भात 5 ऑगस्टपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

असा आहे अंदाज

4 ऑगस्ट : भंडारा, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस. अमरावती, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस.

5 ते 8 ऑगस्ट : विदर्भात बहुतेक ठिकाणी ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता.

9 ते 11 आगस्ट : विदर्भात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता. मुसळधार पावसाचाही अंदाज.

7 व 8 ऑगस्ट : अमरावती, नागपूर व वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...