आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:शासनाचे शुल्क भरण्यास तयार; 30 नाेव्हेंबरला न्यायालयामध्ये सुनावणी

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुना धान्य बाजारातील जागेसाठी आम्ही शासकीय शुल्क भरण्यास तयार असून, याप्रकरणी उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर बुधवारी ३० नाेव्हेंबर राेजी सुनावणी हाेणार आहे, अशी माहिती जुना धान्य बाजार व्यापारी एकता समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जुना धान्य बाजारातील जागेवरील अतिक्रमरण हटवण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला जुना धान्य बाजार परिसराची जागा ही महसूल विभागाच्या मालकीची आहे. ८ हजार ९११ चाैरस फूट असलेली जागा सन १९८० मध्ये लघु व्यावसायिकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली हाेती. याठिकाणी सकाळी व्यवसाय करावा आणि सायंकाळी ताे बंद करावा, या अटीवर ही जागा त्यांना वापरण्यासाठी दिली हाेती. मात्र २० रुपये राेज यानुसार भाड्याने दिलेल्या या जागेवर अनेकांनी बांधकाम केले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात व नंतर शासनापर्यंत पाेहाेचले. मात्र दाेन्ही ठिकाणी काेणताच अंतिम निर्णय झाला नाही.

राज्य शासनाने प्रशासनाला माहिती सादर करण्यास सांगितले. अखेर काही दिवसांपूर्वी मनपाने हे अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रलंबित असून, त्यावर बुधवारी ३० नाेव्हेंबर राजी सुनावणी हाेणार असल्याचे जुना धान्य बाजार व्यापारी एकता समितीने शनिवारी १९ नाेव्हेंबर राेजी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी समितीकडून सीमा ठाकरे व विजय तिवारी यांनी माहिती दिली.

पत्रकार परिषदेला उदयसिंग ठाकूर, श्रीकृष्ण बुळकुले, रामसिंग ठकाूर, नंदकिशाेर पाचकवडे, माे. युसुफ माे. इद्रिस, माे. अकबर माे. सुलेमान आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...