आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • With All Shiv Sainiks In The Constituency Uddhav Thackeray; Shiv Sena District Chief Shantaram Dane's Confidence In The Taluka Level Meeting |marathi News

विश्वास‎:मतदारसंघातील सर्वच शिवसैनिक उद्धव‎ ठाकरे यांच्या सोबत; तालुकास्तरीय बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांचा विश्वास‎

संग्रामपूर‎2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर‎ तालुक्यातील शिवसैनिकांची सर्व ‎ ‎ शाखा व बूथ प्रमुखांची विशेष‎ बैठक आज २३ जून रोजी दुपारी‎ एक वाजता येथील विश्रामगृहात ‎ ‎ घाटाखालील शिवसेना‎ जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.‎ यावेळी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी सध्या घडत असलेल्या‎ राजकीय घडामोडी बाबत माहिती ‎देऊन माझ्या मतदार संघातील‎ सर्वच शिवसैनिक हे उद्धव ठाकरे ‎ ‎ यांच्या सोबत आहेत व राहतील,‎ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‎

घाटाखालील तीन विधान सभा‎ मतदार संघातील सहा तालुक्यांचा‎ मी जिल्हाप्रमुख आहे. मागील दोन‎ दिवसापासून ज्या काही राजकीय‎ घडामोडी घडत आहेत .त्यामध्ये या‎ घडामोडीत एकनाथ शिंदे हे बंडखोर‎ आमदारांना बाहेर घेऊन निघून गेले.‎ त्यातील दोन आमदार परतही आले‎ आहेत. या देशाचे नेतृत्व हे शिवसेने‎ सोबत राहिले आहे.

त्यामुळे या‎मतदारसंघातील सहा‎ तालुक्यातील शिवसेनेचे सर्व‎ पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेना‎ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत‎ आहेत व राहतील, असे त्यांनी‎ सांगीतले. त्यानंतर तालुका प्रमुख‎ रवींद्र झाडोकार म्हणाले की, कोणी‎ बंडखोरी किंवा गद्दारी करीत असेल,‎ तरी काही हरकत नाही. परंतु आपण‎ कोणीही त्यांच्या गटात जाऊ नये,‎ असे आवाहन करून आम्ही सर्व‎ शिवसैनिक हे स्व. बाळासाहेब व‎ यांच्या‎ सोबतच असून भविष्यातही राहू,‎ अशी ग्वाही दिली. यावेळी कैलास‎ कडाळे पाटील, राहुल मारोडे‎ यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे‎ सर्व शाखा प्रमुख, बूथ प्रमुख,‎ पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते.अशी माहिती‎ सेनेचे युवा पदाधिकारी तथा‎ संग्रामपूरचे संजय गांधी निराधार‎ स्वावलंबन योजनेचे सदस्य भैया‎ घिवे यांनी दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...