आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविठू नामाचा गजर व गण गण गणात बोतेच्या नामगजरात श्री संत गजानन महाराजांची पालखी सोमवारी सकाळी 7 वाजता मोठ्या थाटात विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. अश्वांसह 700 वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. दोन वर्षांच्या खंडानंतर हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले होते.
संस्थेचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. मंदिरातून निघालेला पालखी सोहळा यंदा प्रकट स्थळावर गेला नाही. थेट पालखी नागझरी रोडवरील अशोक देशमुख यांच्या मळ्यात पोहोचली. तेथून श्रींची पालखी पुढे नागझरीकडे मार्गस्थ झाली. यावेळी संतनगरीतील हजारो भक्तगणांनी आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप दिला.
पालखीचा पहिला मुक्काम
पालखी सोहळा नागझरी येथे पोहोचल्यानंतर श्री संत गोमाजी महाराज संस्थानच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात येईल. तेथे भोजन केल्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो. पालखी सोहळ्याचा पहिला आजचा मुक्काम पारस येथे आहे.
पालखीचा मार्ग
५ जूनला श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातूर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढामार्गे ८ जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल.
परतीचा प्रवास
पंढरपूर येथे ९ ते १२ जुलैपर्यंत मुक्काम राहून करकंब, कुर्डूवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळर, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेड राजा, बिबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार, खामगाव व ३ ऑगस्टला श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावात परत येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.