आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासभरासाठी होता दोन हजारांचा भाव:महिलेने घरातच सुरू केला कुंटणखाना! पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात, दोन तरुणींची सुटका

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर तालुका उरळ पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या निमकर्दा येथे सुरू असलेल्या एक कुंटणखान्यावर विशेष पथकाने छापा घातला. हि कारवाई गुरुवारी (ता. 26) दुपारी करण्यात आली, यात दोघांना अटक केली, तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली.

निमकर्दा ग्रामपंचायतीच्या समोर एक महिला आपल्या घरीच परजिल्ह्यातील तरुणींना बोलावून त्यांना देहविक्रीसाठी चालना देत होती. याबाबत खात्रिलायक माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिला पंचासमक्ष घटनास्थळी छापा मारला असता तेथे दोन महिला,देहविक्री करताना आढळल्या त्यांची पोलिसांनी सुटका केली असून तेथे आलेल्या दोन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

रक्कम, मोबाईल जप्त

पोलिसांनी छाप्यानंतर तेथे आलेल्या पुरुषांची झडती घेतली त्यात 400 रुपये, 6 मोबाइल 1 दुचाकी जप्त केली. संशयितांना उरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.

एका तासाचे दोन हजार रुपये

व्यवसाय करणारी महिला मागील काही काळापासून हा व्यवसाय करीत होती. ती इतर महिलांनाही स्वतःचे घर व जागा उपलब्ध करून देवून त्यांच्याजवळून दर एका तासाचे दोन हजार रुपये घेत होती, अशी माहिती तपासमध्ये पुढे आली आहे.

बातम्या आणखी आहेत...