आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:‘फोटो व्हायरल’ची धमकी देत लोहारा येथे महिलेवर अत्याचार; एक जण अटकेत

बाळापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३३ वर्षीय महिलेची नग्न छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तालुक्यातील लोहारा येथील ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवा रामदास खानझोडे (वय २३, रा. लोहारा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ महिन्यापूर्वी लोहारा येथील ३३ वर्षीय महिला ही आपल्या घरी आंघोळ करीत असताना त्याने तिच्या घरात शिरुन पीडितेचे मोबाइलद्वारे नग्न छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला चाकूचा धाक दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने नेऊन अत्याचार केले. त्यानंतर वेळोवेळी महिलेला छायाचित्रावरून धमकावून अत्याचार केले; सातत्याने होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पिडीतेने बुधवारी रात्री उरळ पोलिस स्टेशन गाठून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली एका जणाला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...