आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांचे उपोषण:विद्यापीठात काम द्या; मजुरांचे उपोषण ; सर्वोपचार रुग्णालयात केले दाखल

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मजुरांना कामावरून बंद न करता त्यांना काम द्यावे व मजुरांवरील अन्याय टाळावा या मागणीसाठी काही मजुरांनी कृषी विद्यापीठात उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणादरम्यान दोन महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे.

दरम्यान संबंधित आस्थापनेमधून मजुरांना बेजबाबदारपणे कामावरून बंद करणे सुरू केले आहे. तसेच मजुरांना कामावरून बंद करताना कोणत्याची कायदेशीर बाबीचा अवलंब करण्यात आला नाही. आस्थापनेकडे अचानकपणे कामाची उपलब्धता कशी कमी होते याबाबत मजुरांनी अद्याप स्पष्टीकरण दिलले नाही. कंत्राटी पद्धतीने मजूर बोलावून आमच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे मजुरांना तत्काळ कामावर घेऊन त्यांची उपासमार रोखावी या मागणीसाठी १७ जूनपासून कुलसचिव यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा मजूरांनी दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते.कृषी विद्यापीठात काम द्या या मागणीसाठी मजुरांनी उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणादरम्यान दोन महिलांची प्रकृती बिघडली. हातपाय दुखणे, चक्कर येणे, रक्तदाब व उलट्या आदी त्रास होत असल्याने संबंधित महिलांना सर्वोपचार रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक सातमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...