आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांची मंजुरी रखडली:आमदारांसह शिवसैनिकांचा जिल्हाधिकारी कक्षात ठिय्या, चार दिवसांत मंजुरीचे आश्वासन

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री ११ वा. जिल्हाधिकाऱ्यांकडून आरडीसी संजय खडसे यांनी कामाच्या आश्वासनाचे पत्र आमदार देशमुखांना दिले. - Divya Marathi
रात्री ११ वा. जिल्हाधिकाऱ्यांकडून आरडीसी संजय खडसे यांनी कामाच्या आश्वासनाचे पत्र आमदार देशमुखांना दिले.

विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याचा आरोप करीत शविसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शिवसैनिकांसह बुधवारी १५ जूनला सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान रात्री ११ वाजेपर्यंत हे नाट्य रंगले होते.११ वाजता जिल्हाधिकारी व नविासी उपजिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र आमदार नितीन देशमुख यांना देण्यात आले. यात चार दविसांत कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे शविसैनिकांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शविसैनिक मोठ्या संख्येने जमा झाल्याने पोलिसांनी धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कामांशी संबंधित अधिकारी पातूर येथील नगरपालिकेसह परिसरातील २९ कोटी रुपयांची कामे रखडली

पातूर न.प.सह परिसरातील २९ कोटींची विविध विकास कामे रखडली आहे. शासनाकडून कामनिहाय निधी मंजूर झाला आहे. यात खानापूर रोडवर नाली, सिमेंट रस्त्यांसाठी दीड कोटी, साई नगर-आरीफ नगरातील रस्ते व नालीसाठी दीड कोटी, साई मंदिर खानापूर रोडवरील जागेवर आवार भिंत, सभागृह, सभा मंडप- दोन कोटी, सभागृह बांधकाम-एक कोटी, श्री स्वामी समर्थ केंद्रात शासकीय जागेवर सभागृहाच्या कामासाठी ५० लाखांच्या कामाचा समावेश आहे.

ठिय्या आंदोलनावर असा पडला पडदा
रात्री १० च्या सुमारास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात दाखल झाले. त्यांच्यासह नविासी उपजिल्हाधिकारी यांनी आमदार नितीन देशमुख यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर १०.२० च्या सुमारास जिल्हाधिकारी नीमा अरोरा तिथे आल्या. जवळपास, २० मिनीटे जिल्हाधिकारी आणि आमदार नितीन देशमुख यांनी मोबाइलवर आपआपल्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर लेखी आश्वासन देण्यावर एकमत झाले.

अन्य कारभारावरही ओढले ताशेरे

शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात पातूरच्या विकास कामे रखडण्यासह जिल्हा प्रशासनाच्या अन्य कारभारावरही टीका केली. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौधरी कोचिंग क्लासच्या विषयावरही चर्चा झाली. मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबवला होता. मात्र या एकाच क्लासला प्रशासनाने झुकते माप का दिले, अन्य क्लासलाही सहभागी का करून घेतले नाही, सरकारी यंत्रणेला वेठिस का धरण्यात आले, असे सवाल यापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत लोकप्रतिनिधींनी केले होते. याच सभेत जिल्हाधिकारी आणि आमदार नितीन देशमुख यांच्यात खडाजंगी झाली होती.

विविध विकास कामांची मंजुरी रखडल्यामुळे आमदारांसह शविसैनिकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच बुधवारी रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते. रात्री १० वाजता पोलिस अधीक्षक, नविासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी शविसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि आंदोलन करणारे शविसैनिक यांच्याशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...