आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या वतीने शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम जेसीबीच्या मदतीने सुरू केेले आहे. मान्सून तोंडावर आला असताना मनपा क्षेत्रातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई ५० टक्केच झाली होती. तर मोठ्या नाल्यांची सफाई संथगतीने सुरु होती. मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्यास जोरदार पाऊस आला की मोठ्या नाल्यातील पाणी वाहून न जाता सखल भागात नागरिकांच्या घरात शिरते.
गतवर्षी मोठ्या नाल्यांच्या सफाईस विलंब झाल्याने शहराच्या विविध भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरुन त्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षीही नाल्यांची सफाई न केल्याबाबत शिवसेनेचे माजी गटनेते राजेश मिश्रा यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या नाल्यांची सफाई गतीने न सुरु केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
मात्र मनपाने मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरु केले. झोन निहाय जेसीबीने मोठ्या नाल्यांची सफाई सुरु केली. मात्र नाला सफाई पूर्ण होण्यापूर्वी जोरदार पाऊस झाल्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शहरातील २४९ लहान-मोठ्या नाल्यांपैकी मे च्या अखेरपर्यंत १२५ नाल्यांचीच सफाई झाली होती. तर उर्वरित नाल्यांमध्ये मोठ्या नाल्यांचा समावेश होता. मात्र आता प्रशासनाने नाला सफाईचे काम सुरु केले . सर्वाधिक नाले पूर्व झोन मध्ये असून, सर्वात कमी नाले पश्चिम झोन मध्ये आहेत.
साफसफाईदरम्यान अतिक्रमण अडचणीचे
शहरात अनेक मोठे नाले साफ करताना मनपाला अतिक्रमणाचा सामना करावा लागला. ज्या नाल्यांवर अतिक्रमणे होते, ते काढून नाले सफाईचे काम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.