आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई मजदूर काँग्रेसचे आंदोलन:कोविडमध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांचे काम बंद; 6 ते 7 महिन्यांचे वेतन थकले

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या संकटकाळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांचे काम बंद करण्यात आले असून, त्यांचे 6 ते 7 महिन्यांचे वेतन थकल्याने त्यांनी सोमवारी (12 सप्टेंबर) उपोषण केले. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसर्फेजीएमसी व जिल्हा प्रशसानाला निवेदन देण्यात आले. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एका कंपनीने 2017 पासून कंत्राटी पद्धतीने काही कामगारांची नियुक्ती केली. त्यानंतर गत जवळपास 2 वर्षे कोविडच्या काळात जिवाची पर्वा न करता कामगारांनी सेवा केली. मात्र 1 जुलै 2022 पासून सेवा ज्येष्ठता डावलून नवीन 10 कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेसने निवेदनात केला आहे.

उपरोक्त प्रकरणी ऑगस्ट महिन्यातही कामगारांनी आंदोलन केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्ती 14 ऑगस्टपासून आंदोलन स्थगित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महािवद्यालयाच्या प्रशासनाने ही बाब कंपनीशी संबंधित असल्याने चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितल होते. मात्र, अद्यापही याप्रकरणी तोढाचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवारी आकाश जाधव, नीतेश वानखडे यांनी उपोषण सुरू केले. कंपनीच्या प्रमुखांना सूचना देऊन मुदतीच्या आत सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र कामगारांना कामावर रजू करून घेण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने निवेदनातून केली आहे.

ही मागणीही पूर्ण होईना

सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यांन्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉस्पिटलसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. कोविड संकटात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्यातबाबतचे शासनाचे धारणे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांना सेवेत रूजू करून घ्यावे. ही मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ऑगस्ट महिन्यात आंदोलेकरांनी दिला होता. आता पुन्हा कामगारांनी रूजू करून घेणे व वेतन देणे यासाठी उपोषण केले.

बातम्या आणखी आहेत...