आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या जलकुंभाचे काम पुन्हा थांबले:उद्या पोलिस संरक्षणात काम सुरू होणार; आठ पैकी एका जलकुंभाचे काम अद्यापही नाही

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत डाबकी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील रखडलेल्या जलकुंभाचे काम सोमवारी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोध झाल्याने काम थांबविण्यात आले. उद्या बुधवारी (23 नोेव्हेंबरला) पोलिस संरक्षणात या जलकुंभाचे काम सुरू केले जाणार आहे.

अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यात शहरात (मुळ हद्द) आठ नविन जलकुंभाचे बांधकाम केल्या जाणार होते. यापैकी सात जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. तर जुने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानातील जलकुंभाला परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे या जलकुंभाचे काम रखडले होते.

दरम्यान महापालिका प्रशासनाने जलकुंभाचे काम सुरू व्हावे, यासाठी पोलिस संरक्षण मागीतले. यासाठी सात लाख रुपयाचा भरणाही पोलिस प्रशासनाकडे केला. परंतु कंत्राटदाराने जलकुंभाचे काम सुरू करण्यास नकार दिल्याने तीन वर्षानंतर जलकुंभाच्या कामाच्या पुन्हा निविदा बोलावण्यात आल्या. जलकुंभाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र पुन्हा परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता.

मात्र, या दरम्यान विरोधकांनी आयुक्तांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केल्या नंतर काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. आता अनेक महिन्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा विभागाने जलकुंभाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. खड्डा खोदणाऱ्या मशिनच्या चालकाने परिस्थिती पाहून काम सुरू करण्यास नकार दिला. त्यामुळे काम सुरू होवू शकले नाही. प्रशासनाने डाबकी रोड पोलिस ठाणेदारांची भेट घेतली. मंगळवारी पोलिस संरक्षण मिळाल्या नंतर जलकुंभाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

या जलकुंभाच्या कामासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच जलकुंभाचे काम होण्यास किमान वर्ष ते दिड वर्ष लागेल. त्यामुळे जलकुंभाच्या कामास प्रारंभ करताना पोलिस संरक्षण मिळाले तरी पोलिस संरक्षण किती दिवस दिले जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम होईल की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदाना समोर महापालिकेची बंद पडलेली शाळा आहे. या शाळा परिसरात जलकुंभाचे बांधकाम करता येवू शकते. मात्र शाळे लगतच 11 केव्ही उपकेंद्र आहे. त्यामुळे येथे जलकुंभ बांधणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे ही जागा वापरता येऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...