आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘कार्य करताना श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे,’ असे मत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी प्रचारक व कार्यकर्त्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. ही कार्यशाळा श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेतर्फे आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उदघाटन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारप्रमुख दामोदर पाटील, वाडःमय विभागाचे प्रमुख सुशील वनवे महाराज, जिल्हा सेवाधिकारी रवींद्र मुंडगावकर, गोवर्धन खवले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील, भीमरावजी गावंडे, राष्ट्रसंत साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, शेख गुरुजी, प्रशांत गावंडे, श्रीकृष्ण सावळे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.समारोपीय सत्रात अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य भानुदास कराळे, ॲड. वंदन कोहळे, ॲड. संतोष भोरे, डाॅ. अशोक रत्नपारखी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजीराव म्हैसने यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामगीता विचार युवा मंचचे अध्यक्ष शुभम वरणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामगीता विचार युवा मंच व राष्ट्रीय युवा संघटनेने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप कराळे, प्रदीप गिरे, डॉ. राम उपाध्याय, दीपक लुले, रितेश महल्ले, मोहन लुले, गोपाल म्हैसने, रोशन भारसाकळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळेची सांगता राष्ट्र वंदनेने केली.
तीन सत्रात झाली कार्यशाळा
१) कार्यशाळा तीन सत्रांमध्ये पार पडली. प्रथम सत्रात श्री गुरुदेव सेवाकांची आदर्श प्रचार पद्धती व दिशा या विषयावर तज्ज्ञांची मार्गदर्शन केले. २) द्वितीय सत्रात श्री गुरुदेव श्रवणाचा सक्रिय पाठ या विषयावर मंथन झाले. ३) तृतीय सत्रामध्ये प्रचारकांची आदर्श आचार संहिता हा विषयावर मान्यवरांनी प्रबोधन केले.
स्वयंशिस्त आवश्यक
श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे प्रचारक, कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. भेद विरहित , जबाबदारीचे भान ठेवून राष्ट्रसंत यांना अपेक्षित प्राचार्य कार्य करावे, जेणेकरून हा मानवतेचा विचार सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.