आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे मायक्रोटेक्निक या विषयावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील पांडे तर मंचावर डॉ. संजय वाघ, डॉ. रवी जुमळे, डॉ. उमर भाटी तसेच विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक डॉ. सोळंके, डॉ. झिलपे, डॉ. हिंगणकर, डॉ. सोनी व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय भगत हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या हस्ते करण्यात आले व याच कार्यक्रमांमध्ये डॉ. झिलपे यांची विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र या विभागाच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. वरवट बकाल महाविद्यालयातील २० विद्यार्थी, सारडा महाविद्यालयातील २० विद्यार्थी व गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील जवळपास ४५ विद्यार्थी हजर होते व श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथील १०० विद्यार्थी उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय भगत यांनी मायक्रोटेक्निक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन पूनम अनासने हिने केले. तर आभार प्रदर्शन प्राची रेखाते हिने केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळा करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पांडे , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ विजय भगत ,प्राणीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व प्राणीशास्त्र विभागाचे प्रयोगशाळा परिचर, बीएससी अंतिमच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.