आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:सीताबाई महाविद्यालयात ग्राहकांचे अधिकार व कर्तव्यावर कार्यशाळा; मराठी विभाग व वैद्य मापनशास्त्र यंत्रणा अकोला जिल्हा ह्याच्या सहकार्याने

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व वैद्य मापनशास्त्र यंत्रणा अकोला जिल्हा ह्याच्या सहकार्याने ‘ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर प्रदर्शन व कार्यशाळा घेण्यात आली.

सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतिसिंह मोहता, मानद सचिव पवन माहेश्वरी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सीकची यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. अशोक सोनोने होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीपाद कुलकर्णी, वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक गजानन एस. ढाले होते. यावेळी अॅड. श्रीपाद कुलकर्णी यांनी ग्राहक जागृत कसा असावा यावर उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गजानन ढाले यांनी सुद्धा ग्राहकांची फसवणूक कशा प्रकारे केली जाते यावर मार्गदर्शन केले. वाणिज्य विभागाकडून ई-कॉमर्स या विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये विजेत्यांचे मान्यवरांनी प्रशस्तिपत्रके देऊन कौतुक केले.

कार्यक्रमाला प्रा. कोमल श्रीवास डॉ. दीपा कणकेकर, डॉ. प्रिती चापके, डॉ. मेघा नायसे, डॉ. त्रिशला एललकार, प्रा. विद्या चांदुरकर, प्रा. प्रिती कोठारी, प्रा. नेहा फाफट, प्रा. संगीता बजाज, प्रा. वंदना डिवरे, प्रा. गोविंद फेदरे, प्रा. मेघा खडसे, प्रा. शैलजा भुतडा, प्रा. दिपाली शहा, प्रा. सविता राऊत, प्रा. नूतन शर्मा, प्रा. मनीषा पेठे उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...