आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिनीज बुकमध्ये नोंद:महाराष्ट्रात अमरावती-अकोला महामार्गावर विश्वविक्रम! 109 तास 30 मिनिटांत 90 किमीचे डांबरीकरण

अकोला/ अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अमरावती ते अकोला महामार्गावर लोणी-मूर्तिजापूर दरम्यानच्या ७५ किलोमीटर अंतराचे डांबरीकरण १०८ तासांत करण्याचा संकल्प केला होता. या कामाचा प्रारंभ शुक्रवारी सायं ७.३० ला झाला. निर्धारित वेळ मंगळवारी (७ जून) सायं.७.३० ला संपणार होती. पण, त्या आधीच दाेन तास म्हणजे सायं. ५.३० वाजता ७५ किमी डांबरीकरण पूर्ण झाले. त्यापुढे जात रात्री ९ पर्यंत ९० किमी डांबरीकरणाचा विश्वविक्रम केला. या विश्वविक्रमावर ‘गिनीज’च्या लंडन मुख्यालयातून लक्ष ठेवण्यात आले. सदस्य कामाच्या ठिकाणाहून थेट प्रक्षेपण करत होते.

असा विक्रम...
अशी सज्जता
हायवा, डंपर : 206
पेव्हर मशीन : 01
टँडम रोलर,
टायर रोलर : 08
कालावधी :
109.30 तास
एक लेन : 45 किमी
दुसरी लेन : 45 किमी
एकूण मनुष्यबळ : 728
बिटुमिनस (डांबर) : 36000 मेट्रिक टन
गिनीजचे सदस्य : 22
ड्रोन कॅमेरे : 02

बातम्या आणखी आहेत...