आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात २९ जुलै जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त लक्ष्मीचंद महाविद्यालय शेलुबाजार येथील विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काटेपूर्णा अभयारण्यमार्फत केले होते. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना अभयारण्यातील निसर्ग पाऊलवाटवर भ्रमंती करवण्यात आली यात जंगलातील प्राणी,पक्षी,झाडांची ओळख गाईड द्वारे करून दिली.
त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना स्लाईड शोतून काटेपूर्णा अभयारण्य बाबत माहिती व्याघ्र दिनाच्या महत्वाबाबत माहिती काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी दिली. त्यानंतर ताडोबा येथील वाघांच्या जीवनावर आधारित 'टायगर सिस्टर ऑफ तेलिया' ही चित्रफित दाखवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.