आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजन:बार्शीटाकळीत महिलांकडून कावड यात्रा पालखीचे पूजन

बार्शीटाकळी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण सोमवारनिमित्त कावड यात्रेच्या परंपरेनुसार बायपास येथे महिला मंडळाने शिवमुर्तीचे पुजन व आरती केली. दोन वर्षांपासून कोरोना काळात कावड महोत्सवावर मर्यादा होत्या. यंदा निर्बंध हटवल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे. शिवभक्तांद्वारे कावड यात्रेतून जलाभिषेकासाठी नदीचे पाणी आणले. कावड यात्रा मित्र मंडळाने बँडच्या निनादात हातात ध्वज घेऊन, देखावे सादर करून हर हर महादेवचा जयघोष करून कावड यात्रा काढली. सकाळी सात वाजता कावड यात्रेचे शहरात आगमन झाले. शंभूनाथ मित्र मंडळ कावड पालखीचे अध्यक्ष अॅड. विनोद राठोड यांच्या संकल्पनेतून यंदा पूजनाचा मान महिलांना दिला.

त्यामुळे आरती, पुजनासाठी महिलांनी पुढाकार घेतला. पालखी उत्सवातील शिवशंभूची दैनिक दिव्य मराठीच्या करुणा भांडारकर यांच्या हस्ते पूजन करून आरती केली. या वेळी नेहा राऊत, गंगाबाई पटेल यांनीही शिवपूजन, आरतीत सहभाग घेतला. महिला व शिवभक्तांनी आरतीचे पठण केले. बायपास येथे मानाची कावड पालखीचे पूजन, आरतीच्या वेळी आमदार हरिष पिंपळे, रमेश वाटमारे, गजानन वाटमारे, भारत बोबडे, चंदुभाऊ वाटमारे आदींनी पूजा,आरती केली. खोलेश्वर मंदीरात जलाभिषेकासाठी कावड यात्रा निघाली. या वेळी ठाणेदार संजय शेळके, किशोर पिंजरकर यांनी बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...