आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती‎

अकोट14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी कला,‎ वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात‎ मराठी विभाग व यशवंतराव चव्हाण‎ मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त‎ सहकार्याने यशवंतराव चव्हाण‎ यांची जयंती साजरी झाली.‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.‎ सुनील पांडे होते. प्रमुख उपस्थितीत‎ प्रा. डॉ. संजय वाघ उपप्राचार्य, प्रा.‎ डॉ. विलास तायडे, प्रा. सचिन‎ कोठेकर प्रा. डॉ. एम. के. नन्नावरे,‎ प्रा. राजेश मानकर, प्रा. डॉ. गजानन‎ टवरे होते.

प्राचार्य डॉ. सुनील पांडे‎ यांनी यशवंतराव चव्हाण राज्याचे‎ पहिले मुख्यमंत्री आणि प्रज्ञावंत‎ राजकारणी होते. त्यांनी राज्याचा‎ सर्वांगीण विकास करुन शैक्षणिक,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सांस्कृतिक, आर्थिक विकासाची‎ पायाभरणी केली म्हणून त्यांना‎ महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात,‎ असे सांगितले. यशवंतराव चव्हाण‎ हे महाविद्यालयात येऊन गेले आहेत‎ असे सांगून. महाविद्यालय त्यांच्या‎ पदस्पर्शाने पवित्र झाले. या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आठवणींना त्यांनी उजाळा दिला.‎ सूत्रसंचालन प्रा. डॉ. विलास तायडे‎ यांनी केले तर आभार प्रा. सचिन‎ कोठेकर यांनी मानले. कार्यक्रमाला‎ सुनील खवले, संजय पुंडकर,‎ राजपाल खंडेराव, किशोर लादे,‎ संजय मोरखडे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...