आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस, इंधन दराचा भडका:इंधन दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारचा केला निषेध

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसने मदनलाल धिंग्रा चोकात (मध्यवर्ती बस स्थानकासमोर) आंदोलन करत मोदी सरकाराचा निषेध केला. केंद्र सरकारने यावर तोडगा काढून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

सन २०२१पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही दरवाढ कायम होती. मात्र त्यानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आिण इंधन दरवाढीला ब्रेक लागला. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा इंधन दरवाढीने वेग घेतला आहे. परिणामी महागाईदेखील वाढली आहे. दरम्यान शुक्रवारी अकोला युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आकाश कवडे व युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांचे नेतृत्वात शहीद मदनलाल धिंग्रा चौकात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.

तसेच सरकारविरोधात घोषणाही देण्यात आल्या. आंदोलनात . आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, फैजल खान, अंकुश तायडे, मोहमंद शारीक, अमोल ठोकणे, अक्षय देशमुख, कलीम शेख, शेख अब्दुला, अभिजित तवर, सारंग शिंदे, तेजस देवबाले, मुकूंद सरनायक, रवी खैरे, सम्राट ठाकरे, पंकज वाढवे, संदेश वानखडे, अजय ठोसर, अरशद खान, ऋषीकेश सनगाळे, संतोष झांझोटे, सतिश भुरटिया, सुरज भुरटिया, सोहम गवई, सागर अत्तरकर, रोहन पाही, संतोष निधाने, तौसीफ, शोहेल शेख, अरमान जमा, अभिलाष तायडे, चेतन गुहकार, सचिन बडतकार, साजिद इकबाल, शाहरुख खान, अलताफ खान, शुभम तिडके, मनीष तारे , बाबु खान, अरशद शेख, समीर खान, रविद्र तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...