आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात काँग्रेसची निदर्शने:राहुल गांधी चौकशी प्रकरणी युवक काँग्रेसने जाळले टायर; केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधीची ईडी करीत असलेल्याच चाैकशीचा निषेध करत युवक काँग्रेसने बुधवारी दुपारी टायर जाळून आंदोलन केले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून सूडबुद्धीने कार्यवाही सुरू केली आहे. असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेस व नेत्यांची बदनाम करण्याचा प्रकार आहे, अशी टीका युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ जिल्हा युवक काँग्रेस टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आणि भाजप प्रणित ईडी व केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनात युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे , पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शरिक, पूर्व विधानसभा अध्यक्ष अमोल ठोकणे, अर्षद खान, अश्विन खडसे ,वैभव सुरडकर, अक्षय गडेकर ऋषिकेश सनगाळे, सम्राट ठाकरे, तेजस देवबले, हर्ष ढोरे, संतोष निधाणे, शुभम पौल, अमर साबळे, राम कोकाटे,गुड्डू सारवाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

घाेषणांनी गांधी राेड दणाणला

युवक काँग्रेसने केलेले केलेल्या घाेषणांमुळे गांधी राेड दणाणून गेला हाेता. ‘केद्रातील माेदी सरकार मुर्दाबाद, ‘ पहले लढे गाेरेसे अब लढेंगे चाेराेसे, अशा घाेषणा युवकांनी दिल्या. दरम्यान केंद्रातील भाजप सरकारवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांनी टिकास्त्र डागले. भाजप प्रणित केंद सरकाकडून देशातील युवकांचे प्रश्न साेडवण्यापेक्षा राहुुल गांधी व काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचे काम करण्यात येत असल्याचा आराेप कवडे यांनी केला. याचे परिणाम भाजपला भाेगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...