आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आक्रमक:राहुल गांधींच्या समर्थनात युवक काँग्रेस आक्रमक; मुंडण आंदोलन करत केला निषेध व्यक्त

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसतर्फे आता ग्रामीण भागाताही स्वाक्षरी माेहिम राबविण्यात येत आहे. रविवारी अकाेट येथे काँग्रेस, युवक काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहिम राबवत कार्यवाहीचा मुंडन करून निषेध नाेंदविण्यात आला.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नेते तथा तत्कालीन खासदार राहुल गांधी भाष्य केले हाेते. माेदी आडनावावरून तिरकस टीप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दाेषी ठरवले हाेते. त्यानंतर त्यांची खासदारकि रद्द करण्यात आली. दरम्यान अकाेट येथे काँग्रेस, युवक काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

आंदोलन अकोट विधानसभा युवक काँग्रेसचे प्रतीक गोरे व अकोट शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत कुलट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर, प्रभारी नीतेश वानखडे, यांच्यासह अभिलाष तायडे, महेंद्र पवार, अरमान जमा , कपिल ढोके, रोशन चिंचोळकर, वृषभ भाष्कर, शिवराम दिक्कर,कलीम सिकळीकर, सागर तेलगोटे, तेजस भालतिलक, शाहरुख खान,अविनाश कोरपडे,स्वप्नील पाठक,राजा खान, नेते मो.बदरू जम्मा, सारंग मालाणी,पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे, विजय अस्वार,सतीश हाडोळे,डॉ. प्रमोद चोरे, संजय आठवले, दीपक वर्मा,राजेश भालतीलक,नागेश इंगळे,राजू पंडित, हाफिज खान,सयेद असिफ आदी हाेते.

लाेकशाहीचा गळा घाेटण्याचा प्रयत्न

राहुल गांधी ची खासदारकी रद्द करणे हा मोदी सरकारचा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, अशी टिका काँग्रेस नेत्यांनी अकाेट येथील आंदोलनादरम्यान केली. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरत असून, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका नेत्यांनी केली. हिटलरशाही मोदी सरकारचा निषेध असाे, अशी घाेषणा देत आणि निदर्शने करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

असे केले आंदोलन

  • काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ दुपारी अकाेट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी अभियान राबवून आंदोलनकरण्यात आले.
  • आंदोलनस्थळी माेठा फलक लावला हाेता. यावर ‘ संसदेत प्रश्न विचारणे गुन्हा, देश लुटणाऱ्यांना चाेर म्हणणे गुन्हा, अदानीबाबत चाैकशी करण्यास सांगणे हा गुन्हा असे प्रश्न िवचारण्यात आले.
  • देश लुटणाऱ्या प्रवृत्तींवर टिका करणाऱ्यांचा आवाज बंद करण्याच्या कुटील प्रयत्नांचा तीव्र निषेध...तीव्र धिक्कार, ‘एक पाऊल पुढे या...लाेशाही वाचवा ’ असेही फलकावर नमूद करण्यात आले हाेते.
  • काँग्रेसचे 77 वर्षिय ज्येष्ठ महादेवराव सातपुते यांनी स्वतः मुंडन करून अनोखा निषेध व्यक्त केला.