आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महागाईविरुद्ध युवा सेनेने केले थाली बजाव आंदोलन; मूर्तिजापूर रोडवरील पेट्रोल पंपावरील आंदोलनात केंद्रातील मोदी सरकारचा केला निषेध, महागाई कमी करण्याची मागणी​​​​​​​

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेरोजगारी, इंधन दरवाढ व वाढत्या महागाईविरुद्ध युवा सेनेतर्फे रविवारी थाली बजाओ, खुशियां मनाओ, अशी उपहासात्मक घोषणा देत आंदोलन करण्यात आले. थाली वाजवत आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला. हे आंदोलन मूर्तिजापूर रोडवरील पेट्रोल पंपावर करण्यात आले.

गत दोन वर्षात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सामन्यांचे प्रचंड हाल झाले. अनेक जण बेरोजगार झाले. बाजारपेठेचे तर अर्थचक्रच थांबले होते. अशातच काही दिवसांपासून महागाईने उंचाक गाठला असून, जगावे कसे असा प्रश्न सामन्यांना पडला आहे.

दरम्यान महागाईच्या विरोधात युवा सेना रविवारी रस्त्यावर उतरली आिण पेट्रोल पंपावर धाव घेत थाली वाजवत आंदोलन केले. आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप , उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, महानगर प्रमुख नितीन मिश्रा,दीपक बोचरे, अभिजित मुळे, आस्तिक चव्हाण, सौरभ नागोशे,अक्षय नागपुरे, कृष्णा बगेरे,राम गावंडे, नंदिनी पाटीलखेडे , ख़ुशी भटकरसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले.

केंद्रावर टीका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सीएनजी गॅसचे दर कमी करू करून समान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असतानाच दुसरीकडे मात्र केंद्र सरकार मात्र महागाई वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचं पाप करीत असल्याची टीका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पाच राज्यातील निवडणुका होईपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यात आले. मात्र निकाल लागताच भाव वाढण्यास सुरूवात झाली. केंद्रातील सरकार जनतेला छळत असल्याची टीका जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप यांनी केली.

युवा सैनिकांची घोषणाबाजी : युवा सैनिकांनी पेट्रोलपंपावर घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी ‘हेच का अच्चे दिन ?’, बहुत हुई महंगाई की मार होश मे आओ मोदी सरकार’ ‘थाली बजाओ खुशिया मनोओ’ असे फलक हातात घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

...तर दर कमी होणार : एका स्थानिक सर्वेक्षणानुसार, देशातील ६९ टक्के लोक उत्पादन शुल्क कपातीच्या बाजूने आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारकडून पेट्रोलवर ३२.९८ रुपये अर्थात मूळ किंमतीच्या १२५ टक्के कर आकारला जातो. राज्य सरकारही एकूण २२ रुपये कर आकारते. त्यामुळे सरकारने कर कमी केल्यास ग्राहकांना दिलासा मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...