आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेदनादायी:सर्वोपचार रुग्णालयामध्ये शून्य, तर अन्य सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ 15 खाटा

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हतबल रुग्ण अन बेफिकीर सरकारी यंत्रणा, स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारास गर्दी

जिल्ह्यात काेराेना बािधतांची संख्या वाढतच असून, सर्वाेपचार रूग्णालयात बुधवारी दुपारपर्यंत काेराेना बाधितांसाठी एकही बेड (खाट) िशल्लक नव्हता. अन्य सरकारी रुग्णालयांध्येही काेराेना बाधितांसाठी केवळ १५ खाटा शिल्लक हाेत्या. एकिकडे सरकारी रुग्णालतील काळजी वाढवणारे िचत्र असतानाच दुसरीकडे खासगी रूग्णालयात एचआरसीटी या फुफ्फुस स्कॅनिंगमध्ये इन्फेक्शनच्या स्कोअरची स्थिती जाणून घेऊनच रूग्णाला भरती करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे िदसले. १२ पेक्षा जास्त स्काेअरच्या रुग्णाला काही खासगी रूग्णालये भरती करण्यास टाळत करीत असल्याची माहिती अाहे. त्यामुळे हतबल रूग्ण, बेफिकिर सरकारी यंत्रणा, असे संतापजनक िचत्र दिसून येत अाहे.

जिल्ह्यात काेराेनाचा धुमाकूळ सुरूच असून, सरकारी, खासगी रूग्णालयांमध्येही बेडची कमतरता निर्माण झाली. प्रयत्नांनी खासगी रूग्णालयात खाट उपलब्ध हाेत अाहे. बांधितांची संख्या वाढतच असल्याने अाराेग्य यंत्रणेला ताण असह्य हाेत अाहे. अाैषधी, अांॅक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला . शहरातपुरता मर्यादीत प्रादुर्भाव गावांत हाेत अाहे. रुग्णांना ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा मिळणेही दुरापास्त झाले आहे.

...यासाठी प्रयत्न अावश्यक
विना परवानगी अवैधरित्या काेराेना रुग्णांवर उपचार करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० खासगी रुग्णालयांना िजल्हा प्रशासन व मनपाने दंड ठाेठावला हाेता. या कार्यवाहीने उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले. मात्र काही रूग्णालयांनी काेविड रूग्णांवर उपचार करणे बंद केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. िनयमांचे उल्लंघन हाेणार नाही, रूग्णांकडून जादा पैसे अाकारु नये, यासाठी खरबदारी अावश्यकच अाहे. मात्र कार्यवाहीनंतर या रूग्णालयांत काेराेना बाधितांवर उपचारही व्हावेत, यासाठीही प्रशासनाने पुढाकार घेणे, ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे अाहे.

अशी हाेती रिक्त खाटांची स्थिती

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजन सुविधेसह अन्य एकही खाट उपलब्ध झाली नाही. सरकारच्या आरकेटीमध्ये ९, व जिल्हा स्त्री रुग्णालयात ६ खाटा रिक्तची माहिती मिळाली.
  • खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता िवभागात एकही बेड िरक्त नव्हता. मात्र अन्य रिक्त असलेल्या खाटांची संख्या ४२ हाेती.

पाहणी करुन खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता द्यावी
सरकारी यंत्रणांकडून कोविड उपचारासाठी प्रयत्न केले जात असले तरी वाढती रुग्ण संख्या बघता ही व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन व आरोग्य विभागाने तातडीने पाहणी करावी अािण खासगी डॉक्टरांना तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री, अामदार डाॅ. रणजित पाटील यांनी यापूर्वीच केली हाेती. रूग्णांची संख्या अाणि रिक्त असलेल्या खाटांवरून या मागणीचा तातडीने िवचार हाेणे अावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. रूग्णांकडून नियमापेक्षा जादा िबल घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंिधतांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते. मान्यता देण्याबाबत एकखिडकी याेजना प्रशासनाने सुरू करावी, असेही त्यांचे म्हणणे अाहे.

बातम्या आणखी आहेत...