आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही ठोस-मोठ्या निर्णयावनिाच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची सभा पार पडली. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुढील महनि्यात संपत असून, जास्तीत-जास्त आणखी एक सभा पुढील महनि्यात होऊ शकते. त्यामुळे आता शेवटच्या सभेत तरी प्रलंबित असलेले सर्व विषय निकाली निघावेत, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते, पथदविे, नाली, सभागृहांचा समावेश असतो. मात्र अनेकदा कामांच्या मंजुरीवरून सदस्यांमध्ये मतभेद होतात.त्यामुळे कामे प्रत्यक्ष सुरु करण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकते. दरम्यान शुक्रवारी झालेल्या समाज कल्याण समितीच्या सभेच्या विषयसूचीवर केवळ एकच विषय होता. हा विषय मंजूर करण्यात आला. सभेला सभापती आकाश सिरसाट, सदस्य रामकुमार गव्हाणकर, आम्रपाली खंडारे, संदीप सरदार, माया नाईक, वंदना झळके, संगिता अढाऊ, प्रकार वाहुरवाघ हे होते. सचवि म्हणून समाज कल्याण अधिकारी पुंड यांनी कामकाज पाहिले. सभेत हे होते विषय समाज कल्याण समितीच्या सभेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास करणे, या योजनेतअंतर्गत पंचायत समितीस्तरावरुन प्राप्त काम बदलाच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. तसेच यापूर्वी झालेल्या सभेच्या इतविृत्ताला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या सभेत उपस्थित पदाधिकारी, सदस्या, अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.