आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थी व शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीतर्फे साेमवारी ८ ऑगस्टला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यामातून शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न हाेणार आहे. शिक्षकांच्या अनेक मागण्या शासन व स्थानिक प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी अनेकदा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र त्यावर ताेडगा निघाला नाही. अखेर आम्हाला शिकवू द्या, अशी हाक देत शिक्षकांवर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. साेमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनात शिक्षकांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख , राज्य प्रतिनिधी मारोती वरोकार , गोपाल सुरे , पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय टोहरे, सरचिटणीस प्रशांत अकोत , अनील पिंपळे, संजय इंगळे, किशोर कोल्हे, रामेश्वर सिरसकर, दरबारसिंग राठोड, सुधिर डांगे, राजेश वानखडे, विनोद भिसे , विकास राठोड,सुरेंद्र सोनटक्के यांनी केले आहे.
शिक्षकांची भावना : शिक्षकांनी आंदाेनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी कळवले आहे. पत्रात अनेक मागण्यांचा उहापोह केला आहे. यात अनेक प्रकारची पत्र , ऑनलाईन माहिती देऊनही पुन्हा पुन्हा कागदपत्रांची मागणी करणे, वेळोवेळी विनाकारण बँकेतील खाते बदलणे , पोषण आहार योजनेचे वारंवार लेखापरिक्षण व त्याबाबत माहिती मागविणे , बी.एलओसारख्या कामाकरता शिक्षकांच्या नेमणूक करणे आंदीचा सामवेश आहे. या सर्व प्रकाराला शिक्षक कंटाळले असून यात वाया जाणारा अधिकचा वेळ यामधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला कमी वेळ मिळत असल्याची भावना शिक्षकांची आहे.
विद्यार्थ्यांची निगडीत मागण्या : शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी निगडीत अनेक मागण्याही लावून धरल्या आहेत. यात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावा ,शिकस्त झालेल्या वर्ग खोल्यांची त्वरित बांधकाम करण्यास निधी मंजूर करावा , शाळांना भौतिक सुविधा द्याव्यात , जि.प शाळांची विद्युत देयके शासनाने दरमाह भरावीत, (जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येणार नाहीत) ओबीसी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्यांच्या खाते जमा करावी आदींचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.