आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Zilla Parishad School Students Will Appear In A Short Film; Guru' Shows The Passionate Bond Between Teacher And Students| Marathi News

अभिनय:जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी लघुचित्रपटात झळकणार; गुरु'मध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांमधील उत्कट भावबंधाचे दर्शन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कानशिवणी येथून जवळच असलेल्या टाकळी (छबिले) परिसरात ‘गुरु' या लघुचित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, शिक्षक आणि निरागस विद्यार्थ्यांमधील उत्कट भावबंध चितारणाऱ्या या लघुचित्रपटात गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिनय केला आहे.

ही निर्मिती जागर फाउंडेशनच्या वतीने प्रा. संतोष हुशे यांनी केली असून, वाड्या-वस्त्यांवर तळमळीने शिकवणाऱ्या एका शिक्षकाची आणि त्याच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची ही गोष्ट डॉ. महेंद्र बोरकर यांच्या दिग्दर्शनात साकारण्यात आली आहे. लवकरच हा लघुचित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रभात किड्सचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी सृजन बळी आणि स्कूल ऑफ स्कॉलर्सची इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी पूर्वा प्रमोद बगळेकर तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तथा अभिनेते किशोर बळी यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

डॉ. रमेश थोरात, सचिन गिरी, मेघा बुलबुले, राहुल सुरवाडे, ऐश्वर्या मेहरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘गुरु'चे संगीत दिग्दर्शन मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख डॉ. कुणाल इंगळे यांनी केले असून, चित्रीकरण तथा संकलन विश्वास साठे यांनी तर रंगभूषा प्रवीण इंगळे यांनी केली आहे. बार्शीटाकळी गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, गणेश राठोड, केंद्रप्रमुख महेश बावणे, सरपंच नंदा चोटमल, शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण छबिले, नंदकिशोर चिपडे, टाकळी (छबिले) ग्रामपंचायत, गावकरी मंडळींचे सहकार्य लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...