आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या शुक्रवारी दुपारी झालेल्या आराेग्य समितीच्या सभेत आराेग्य उपकेंद्रांसह अन्य कामे अपूर्ण राहिल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. पावसाळा ताेंडावर असल्यानंतरही कामे पूर्ण का झाली नाहीत, याला जबाबदार काेण, असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. काही ठिकाणी प्रस्तावानुसार काम हाेत असल्याचेही सदस्य म्हणाले. त्यामुळे आता संबंधित शाखा अभियंत्यांवर कार्यवाहीचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे.
कामाला होत आहे विलंब
आराेग्य सुविधा दुर्गम भागापर्यंत पाेहाेचण्यासाठी सरकारकडून काेट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदसारख्या स्वराज्य संस्थांना मंजूर करण्यात येताे. या निधीतून आराेग्य केंद्र, उपकेंद्र बांधकाम, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम, दुरुस्तीवर खर्च करण्यात येताे. दरम्यान या कामांना विलंब हाेत असल्याचा प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आराेग्य समितीच्या सभेत समाेर आला.
3 काेटी 61 लाखाची कामे रखडली
जवळपास 3 काेटी 61 लाखाची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत आराेग्य व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. उपकेंद्राची दुरुस्ती करण्याऐवजी आवार भितींचे काम करण्यात आले. कामांना विलंब हाेत असल्याने आण ठरल्यानुसार कामे हाेत नसल्याने संबंधित शाखा अभियंत्यांवर कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला.
सभेला जि.प. उपाध्यक्षा तथा आराेग्य समिती सभापती सािवत्री राठाेड, शिवसेनेचे सदस्य गाेपाल भटकर, वंचित बहुजन आघाडीच्या सदस्या पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, काँग्रेसच्या सदस्या अर्चना राऊत उपस्थित हाेत्या. सभेचे कामकाज सचिव म्हणून जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसाेले यांनी सांभाळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.