आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचुलत भावाने व्यापारी दीपक सोमया यांच्या आजोबांच्या नावात बदल करून बँकेत खोटे मृत्यू प्रमाणपत्र सादर केले व आजोबांच्या खात्यातून १० लाख रुपये काढून फसणूक केल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी भावेश ठक्कर विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर येथील रहिवासी दीपक मनिकांत सोमया यांचे आजोबा ठाकरसी सोमय्या यांचे एक वर्षाआधी निधन झाले. दीपक यांचा घाटकोपर, मुंबई येथील रहिवासी असलेला चुलत भाऊ भावेश रणजित ठक्कर यांच्याशी संपत्तीपासून वाद सुरू होता. दरम्यान, भावेशने ठाकरसी यांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून त्यात त्यांचे नाव चंद्रकांत ठक्कर असे नोंदवले. तसेच मृत ठाकरसी हे आपले आजोबा आहेत, असे दर्शविले. त्यानंतर जयस्तंभ चौकातील अकोला अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेतून धनादेशाद्वारे मृताच्या ७६८ या खाते क्रमांकातून १० लाख रुपये भावेशने स्वत:च्या खात्यावर जमा केले.
या फसवणुकीची ज्यावेळी दीपक सोमाला माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला. त्यांच्या तपासात भावेशने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून खात्यातून रक्कम काढल्याचे उघड झाले. त्यानंतर दीपाच्या तक्रारीवरून भावेशविराेधात कलम ४२०, ४६७, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.