आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती कोरोना:खासदार नवनीत कौर राणा यांच्या मुलांसह कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण

अमरावती3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे सासू-सासरे म्हणजेच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे आई-वडिलांन कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले होते. यानंतर आता रवी आणि नवनीत राणा यांच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमदार रवी राणा यांच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सोमवारी समोर आले होते. यानंतर राणा कुटुंबातील आणि इतर संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात रवी आणि नवनीत राणा यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतू, मुलगा, मुलगी यांच्यासह कुटुंबातील 10 जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.