आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका क्षेत्रातील केंद्रीय प्रवेश प्रणालीद्वारे जारी करण्यात आलेल्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या ५ हजार ५२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यानंतरही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १० हजार ६६९ जागा रिक्त आहेत.
प्रशासन कोट्यातील प्रवेश प्रक्रियेनंतर सर्वसाधारण प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या यादीत कला शाखेचे ९९९, वाणिज्य शाखेचे ८५१, विज्ञान शाखेचे ३ हजार ७७१ आणि एमसीव्हीचे ३०० असे एकूण ५ हजार ९२१ विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी दिली होती. त्यानुसार ३ ते ६ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या प्रवेश प्रक्रियेत ५ हजार ५२९ विद्यार्थ्यांनी ्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयात अजूनही १० हजार ६६१ जागा रिक्त आहेत. तसेच प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपर्यंत पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत आणि द्विलक्षी विषयात प्रवेश घेण्याची मानसिकता आहे. त्या विद्यार्थ्यांनी ९ ऑगस्टपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आपली पसंती नोंदणी करणे बंधनकारक असेल. अशी माहिती ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीचे समन्वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.