आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:१०७ वर्षांच्या आजीने टोचून घेतली प्रतिबंधक लस

मोझरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोझरीतील गयाबाई चवणे कोरोनाला हरवण्यासाठी कुटुंबासह झाल्या सज्ज

सध्या देशभरात तिसऱ्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यामध्ये आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लसीकरण करून घेत आहेत. सोबतच वृद्ध देखील कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेत असतानाच बुधवारी (दि. १७) मोझरी शहरातील १०७ वर्षांच्या आजीने कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. गयाबाई चवणे असे १०७ वर्षांच्या आजीचे नाव आहे.

गयाबाई चवणे या आजीने बुधवारी आपल्या कुटुंबासह तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. जिल्ह्यात शंभरी पार केलेल्या गयाबाबई चवणे या एकमात्र असाव्यात. लसीकरणानंतर कुठलाही त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगीतले. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लस टोचून घेण्याचे आवाहन देखील आजीने नागरिकांना केले आहे. मनात कुठलीही भीती न ठेवता वयाच्या १०७ व्या वर्षी लसीकरण केल्यामुळे डॉक्टरांनी आजीचे कौतुक केले. लसीकरणासाठी आजीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल तिवसा येथील सेवारत फाउंडेशनचे प्रमोद बोराळकर आणि सचिन राऊत यांनी आजीचा सत्कार देखील केला. अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध सुद्धा लसीकरण करून घेत आहे. अशातच गयाबाई चवणे या आजीने देखील लस टोचून घेण्याची इच्छा आपल्या कुटुंबाकडे व्यक्त केली होती. त्यामुळे बुधवारी त्यांना त्यांचे कुटुंबीय लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात घेवून आले होते.

डॉक्टरांनी केले आजींचे कौतुक
साधे इंजेक्शन घेताना भल्याभल्यांच्या मनात धास्ती असते, परंतु कोरोनाच्या वर्षभराच्या काळात त्यापासून बचाव करून मनात कुठलीही भीती न ठेवता वयाच्या १०७ व्या वर्षी लसीकरण केलेल्या गया आजींचे लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांनी कौतुक केले. कुटुंबासह ग्रामीण रुग्णालयात जावून कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेताना गायाबाई चवणे या १०७ वर्षांच्या आजी.

बातम्या आणखी आहेत...