आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव मंडळ:107 वर्षांची उज्ज्वल परंपरा; आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिकप्राप्त लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातील विठ्ठल मंदिरापुढे सर्वांत जुने १०७ वर्षांची क्रीडा, कला या क्षेत्रात उज्वल परंपरा असलेले लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ आहे.या मंडळाची स्थापना १९१६ मध्ये स्वातंत्र्यवीर पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रेरित होऊन केली.

युवा पिढी संस्कारक्षम राहावी तसेच नागरिकांमध्ये एकता नांदावी या उद्देशाने स्थापित या गणेशोत्सव मंडळाने यंदा १०७ व्या वर्षी मंडप फुलांनी सजवण्यात आला असून, मध्यभागी देखणे कारंजे बसवण्यात आले आहे.

वैशिष्ट्य : लहान मुलांच्या हातूनच पूजा
लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळात लहान मुलांच्या हातूनच सकाळी व सायंकाळी पूजा व आरती केली जाते. त्यामुळे येथे पंडितांची आवश्यकता राहत नाही. केवळ मंडळातील ज्येष्ठ सदस्य या लहान मुलांना मार्गदर्शन करतात. मंडळाचे अनेक सदस्य विदेशात राहतात ते ऑनलाइन मदत करीत असतात.

शताब्दी वर्षात उभारला रामदरबार
लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळाने २०१५ मध्ये शताब्दी वर्ष साजरे केले. यावेळी राम दरबाराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तसेच गुहा तयार करून त्यात रामायणाच्या ५१ अध्यायातील प्रसंग साकारण्यात आले होते. मंडळाच्या देखाव्याला मूर्त रूप देण्याचे काम नितेश परमार व सोनसळे पेंटर करीत असतात. या गुहांमध्ये झरेही वाहत होते. ते झरे ५ हाॅर्सपाॅवरच्या मोटारद्वारे संचालित केले जायचे. गुहेच्या पुढे प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...