आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांनी महसूल वसुलीची कारवाई उत्तमरित्या पार पाडल्याने विभागाच्या उद्दिष्टाच्या १०८ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. शासनाकडून २०२२-२३ साठी अमरावती विभागात ४३८ कोटी २७ लाख रुपये. महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. विभागाने त्याहून जास्त म्हणजेच ४७६ कोटी ३ लाख ८१ हजार वसुली प्राप्त केली आहे. या वसुलीत विभागातील सर्व जमीन महसूल व गौण खनिज या दोन्हीपासून प्राप्त झालेल्या एकूण रकमेचा समावेश आहे. विविध जिल्हा प्रशासनांनी केलेल्या कामगिरीबाबत विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम या पाचही जिल्ह्यांत एकूण १३८ कोटी १९ लाख ७१ हजार रु. (१०३ टक्के) जमीन महसूल प्राप्त झाला आहे. गौण खनिज उत्पादनांत विभागाला एकूण ३०५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. विभागाने ३३७ कोटी ७५ लाख ९५ हजार रुपये वसुली केली. अमरावती विभागाच्या एकूण उद्दिष्टाच्या ११०.७४ टक्के वसुली झाली. महसूल वसुलीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल गोळा करून विभागातील जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली. पुढील वर्षी याचप्रकारे उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी समन्वयाने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.