आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त पदे:1,194 ग्रामपंचायत सदस्यांची पदे आरक्षित ; ओबीसीलाच स्थानच नाही

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या २७१ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले असुन यातील एकूण २२०९ ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांपैकी ११९४ जागा एससी, एसटी व ओबीसीकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर १०१५ जागा खुल्या प्रवर्गात असल्याने येथे कूणालाही निवडणुक लढता येणार आहे.

जिल्ह्यात सद्या कार्यकाळ संपलेल्या २७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज आहे. यापुर्वी निवडणुकीपर्यंत आलेले कार्यक्रम विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते. सद्या नविन कार्यक्रमाप्रमाणे या २७१ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ओबिसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार तब्बल १४८ ग्रामपंचायतींमध्ये ओबिसीला स्थानच मिळाले नाही तर केवळ १२३ ग्रामपंचायतींमध्ये ओबीसीच्या जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. २७१ ग्रामपंचायतींमध्ये ८५१ प्रभागात २२०९ जागांकरिता निवडणुक होणार आहे.यामधुन अनुसूचित जातीकरिता ४४६ जागा आरक्षित करण्यात आल्या असून २४५ जागांवर महिलांना आरक्षण देण्यात आले आहे.अनुसूचित जमाती करिता ५८३ जागा आरक्षित असुन यातुन ३०३ जागा महिलांकरिता आरक्षित आहेत. तर ओबीसीकरिता १६५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात ९४ जागांवर महिला निवडणुक लढणार आहे.तर इतर १०१५ जागा खुल्या प्रवर्गात असुन या पैकी ५९४ जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात सर्वाधिक ५६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...