आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिन्ही शाखेतील अकरावीच्या 8340 जागा रिक्त:27 ऑगस्टपासून प्रवेशाची चौथी फेरी; विद्यार्थ्यांच्या लांबच-लांब रांगा

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता अकरावीची तिसरी फेरी आटोपल्यानंतरही शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांच्या 8 हजार 340 जागा रिक्त आहेत. त्यासाठी आगामी शनिवार, 27 ऑगस्टपासून प्रवेशाची चौथी फेरी सुरू होत आहे.

केंद्रीय प्रवेश समितीचे समन्यवक प्रा.अरविंद मंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार विज्ञान शाखेच्या सर्वाधिक 2 हजार 515, एमसीव्हीसीच्या 2 हजार 235, कला शाखेच्या 1 हजार 978 आणि वाणिज्य शाखेच्या 1 हजार 612 जागा रिक्त आहेत. त्यामुळे अद्याप ज्यांचा प्रवेश निश्चित झाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म क्रमांक दोन भरुन द्यावा. या फॉर्ममध्ये पसंतीक्रम नोंदवायचा असतो. संबंधितांनी तो काळजीपूर्वक नोंदवून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहनही प्रा. मंगळे यांनी केले आहे.

फॉर्म क्र. 2 भरा

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी फॉर्म क्रमांक दोन भरून दिला होता, त्यांना नव्याने हा फॉर्म भरून द्यावा लागेल, असे सांगतानाच प्रवेश न मिळालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी तो भरावा, असे समितीचे म्हणणे आहे. 27 ऑगस्टपासून सुरू होणारी फॉर्म भरण्याची प्रक्रिया किमान दोन दिवस चालेल. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी सदर फेरीची गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. या यादीनुसार सदर विद्यार्थ्यांना त्या-त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविता येईल.

केंद्रीय पद्धतीचा फायदा

अमरावती महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास टाळला जातो. विद्यार्थ्यांना केवळ एकच अर्ज भरून आपला पसंतीक्रम नोंदविता येतो. एरवी प्रत्येक महाविद्यालयात पोहचून तेथील माहितीपत्रक विकत घ्या, आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरा आणि गुणवत्ता यादीत नावाचा समावेश झाला की नाही, हे पाहण्यासाठी वारंवार त्याठिकाणी चकरा मारा, असा द्रवीडी प्राणायाम करावा लागायचा. सदर केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे तो टळला आहे.

अशी आहे रिक्त पदे

शाखा क्षमता प्रवेश रिक्त जागा

कला 3,630 1652 1978

वाणिज्य 2810 1198 1612

विज्ञान 7000 4485 2515

एमसीव्हीसी 2750 515 2235

एकूण 16190 7850 8340

बातम्या आणखी आहेत...