आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागीच मृत्यू:सुरजागड लोहखनिज वाहतुकीचा बळी;‎ ट्रकने 12 वर्षीय बालिकेला चिरडले

प्रतिनिधी | गडचिरोली‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून‎ १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी‎ चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे वन विभागाच्या तपासणी ‎ नाक्यासमोर घडली. सोनाक्षी मसराम वय १२ रा. नांदगाव‎ फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव आहे.‎ ही मुलगी आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक एमएच ३४‎ ए झेड ९५७५ ने आलापल्ली- चंद्रपूर मार्गावरील आष्टीवरून‎ गोंडपिपरीकडे जात होती. दरम्यान, वन विभागाच्या तपासणी‎ नाक्यासमोर दुचाकी घसरल्याने सोनाक्षी आणि तिचा मामा‎ खाली पडले. एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज‎ घेऊन जाणाऱ्या अनियंत्रित ट्रकच्या चाकाखाली आल्याने‎ सोनाक्षीचा जागीच मृत्यू झाला.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. ट्रक हा‎ सूरजागड येथून लोह खनिजाची वाहतूक करणारा असल्याचे‎ प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन‎ पंचनामा केला. फरार ट्रकचालकाचा पत्ता लागला असून‎ त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती आष्टी‎ पोलिसांनी दिली.‎

या मार्गावर नेहमीच घडतात अपघात‎ दीड वर्षांपासून या मार्गावर सूरजागड येथून लोहखनिज‎ वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल असते.‎ त्यामुळे या मार्गावर नेहमी अपघात होत असतात. तरीही‎ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष‎ व्यक्त होत आहे.‎ या मार्गावर नेहमीच घडतात अपघात‎ दीड वर्षांपासून या मार्गावर सूरजागड येथून लोहखनिज‎ वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल असते.‎ त्यामुळे या मार्गावर नेहमी अपघात होत असतात. तरीही‎ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष‎ व्यक्त होत आहे.‎