आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस:सिनेटच्या 37 जागांसाठी 129 विद्वत परिषदेच्या 6 जागांसाठी 16 जण मैदानात

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट (अधीसभा), विद्वत परिषद (एकेडेमीक कौन्सिल) व अभ्यास मंडळांच्या (बोर्ड ऑफ स्टडीज्) निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस उद्या, शुक्रवार, ४ ऑक्टोबर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या मैदानात नेमके कोण-कोण कायम राहील, याचा उलगडाही उद्याच होणार आहे.

विद्यापीठ सिनेटच्या ३९, विद्वत परिषदेच्या ८ व अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी आगामी २० नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल. या तिन्ही प्राधिकारिणींच्या निवडणुकीसाठी गेल्या २७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी २८ ऑक्टोबरला सर्व अर्जांची छाननी करुन त्यातील वैध व विधीग्राह्य नसलेल्या अर्जांची यादी घोषित करण्यात आली. त्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरु झाली असून उद्या, शुक्रवार, ४ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

दरम्यान सिनेट आणि विद्वत परिषदेतील प्रत्येकी एका जागेसाठी पात्र उमेदवारच न भेटल्याने त्या दोन्ही जागा रिक्त राहणार असून दोन्ही प्राधिकारिणींमध्ये प्रत्येकी एक जागा बिनविरोध निवडली गेली आहे. त्यामुळे सिनेटच्या ३९ ऐवजी ३७ तर विद्वत परिषदेच्या ८ ऐवजी ६ जागांसाठीच प्रत्यक्ष निवडणूक घेतली जात आहे. दरम्यान सिनेटच्या ३७ जागांसाठी १२९ तर विद्वत परिषदेच्या ६ जागांसाठी १६ जण मैदानात आहेत. यापैकी किती जण मैदानात कायम राहतात आणि किती जण माघार घेतात, हे उद्याच्या माघारीअंती स्पष्ट होणार आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने यावर्षी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्या नेतृत्वातील ‘नुटा’, प्रा. प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वातील शिक्षण मंच आणि प्रा. कमलाकर पायस यांच्या नेतृत्वातील जस्टीस पॅनलसह बरेच अपक्ष यावेळी मैदानात आहेत.

सिनेट, विद्वतकडे सर्वांचेच लक्ष

दहा प्राचार्य, दहा पदवीधर विद्यार्थी, दहा प्राध्यापक, संस्थाचालकांचे सहा प्रतिनिधी आणि विद्यापीठातील तीन शिक्षक अशाप्रकारे सिनेटच्या ३९ तसेच प्रत्येक विद्याशाखेतील प्रत्येकी दोन यानुसार चार विद्याशाखांमधून विद्वत परिषदेवर पाठविल्या जाणाऱ्या ८ पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधी उल्लेख झाल्याप्रमाणे पात्र उमेदवारांअभावी या दोन्ही प्राधिकारिणीतील एकेक जागा रिक्त राहणार असून एकेक जागा बिनविरोध निवडण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...