आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शिक्षक सहकारी बँक निवडणूक:शिक्षक बँकेच्या मतपत्रिकेवर दिसणार बॅट, पतंग, नगारा, पंखा, छत्री, कपबशीसह 13 चिन्हे

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार क्षेत्रातील अग्रणी बँकांपैकी एक असलेल्या जि.प. शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आगामी 2 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान आज, मंगळवारी निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. त्यानुसार मतपत्रिकेवर छताचा पंखा, कपबशी, नगारा, पतंग, छत्री व बॅटसह एकूण 13 चिन्हे दिसून येणार आहे.

वरील सहा चिन्हे ही प्रमुख पॅनलची असून याशिवाय गॅस सिलींडर, नारळ, दूरदर्शन, मशाल, पेन, गुलाब व विमान ही सात चिन्हेही या निवडणुकीच्या मतपत्रिकेत उमटणार आहेत. अशाप्रकारे एकूण 13 प्रकारच्या चिन्हांचा निवडणुकीच्या मतपत्रिकेत समावेश असेल. 21 सदस्यीय संचालक मंडळासाठी या निवडणुकीत अपक्षांव्यतिरिक्त पाच वेगवेगळ्या पॅनलमध्ये स्पर्धा आहे. त्यापैकी सत्ताधारी प्रगती पॅनलच्या हातात बॅट आली असून समता पॅनलला छताचा पंखा हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले आहे. क्रांती पॅनलला पतंग, परिवर्तन पॅनलला छत्री, युवाशक्ती पॅनलला कपबशी आणि एकता-अपक्ष पॅनलला नगारा हे चिन्ह मिळाले आहे.

क्रांती, प्रगती, युवाशक्ती आणि समता या चारही पॅनलने सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले असून परिवर्तन पॅनलने 15 तर एकता-अपक्ष पॅनलने आठ जागांवर दावा ठोकल्याची माहिती आहे. प्रारंभी या निवडणुकीत 122 उमेदवार होते. परंतु माघारीदरम्यान आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 114 उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या सात चिन्हांवर लढणाऱ्या सात अन्य उमेदवारांचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...