आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजि. प. शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २ जुलै रोजी होत आहे. मंगळवारी उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. मतपत्रिकेवर छताचा पंखा, कपबशी, नगारा, पतंग, छत्री, बॅटसह १३ चिन्हे दिसून येणार आहे.
वरील सहा चिन्हे ही प्रमुख पॅनलची असून याशिवाय गॅस सिलिंडर, नारळ, दूरदर्शन, मशाल, पेन, गुलाब व विमान ही सात चिन्हेही या मतपत्रिकेत उमटणार आहेत. २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी या निवडणुकीत अपक्षांव्यतिरिक्त पाच वेगवेगळ्या पॅनलमध्ये स्पर्धा आहे. त्यापैकी सत्ताधारी प्रगती पॅनलच्या हातात बॅट आली असून समता पॅनलला छताचा पंखा हे निवडणूक चिन्ह प्राप्त झाले आहे. क्रांती पॅनलला पतंग, परिवर्तन पॅनलला छत्री, युवा शक्ती पॅनलला कपबशी आणि एकता-अपक्ष पॅनलला नगारा हे चिन्ह मिळाले आहे.
क्रांती, प्रगती, युवा शक्ती आणि समता या चारही पॅनलने सर्व जागांसाठी उमेदवार उभे केले असून परिवर्तन पॅनलने १५ तर एकता-अपक्ष पॅनलने आठ जागांवर दावा ठोकल्याची माहिती आहे. प्रारंभी या निवडणुकीत १२२ उमेदवार होते. परंतु माघारी दरम्यान आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ११४ उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या सात चिन्हांवर लढणाऱ्या सात अन्य उमेदवारांचाही समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.