आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ओटीपी विचारून दर्यापूरच्या तरुणाची 1.30 लाखाने फसवणूक ; प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल

दर्यापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापुरातील सिव्हिल लाईन भागात राहणाऱ्या संयम किरण बायस्कार (२१) या तरुणाला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून ओटीपी विचारला. तरुणाने ओटीपी देताच तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्यापूर येथील संयम बायस्कार हा युवक खासगी कंपनीत नोकरीला असून, त्याचे एका बँकेत अमरावती येथे खाते आहे. येथील खातेदारांना मार्च २०२२ ला क्रेडिट कार्ड देण्यात आले. त्यामध्ये आरोग्य विम्याची सुविधा अंतर्भूत आहे. आरोग्य विम्याचे दरमहा दोन हजार रुपये क्रेडिट कार्डमधून वजा केले जाणार होते. दरम्यान, तोतया महिलेने संयम बायस्कार यांना संपर्क करुन दोन हजार रुपयांचा हप्ता ऑनलाइन प्रोसेस करून कमी करून देण्याची बतावणी केली. दरम्यान, बायस्कार यांनी ऑनलाइन प्रोसेसला मंजुरी दिली. तसेच क्रेडिट कार्ड नंबर, मोबाइल नंबर आणि ओटीपी सांगितला. ओटीपी मिळताच तोतयाने ताबडतोब त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून अवघ्या काही वेळातच ६५ हजार रुपयांचे व त्यानंतरच्या दुसऱ्या तासात पुन्हा ६५ हजाराचे असे एकूण १ लाख ३० हजार रूपयाचे ऑनलाइन साहित्य खरेदी केले. या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात ओटीपी विचारून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार अलीकड मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...