आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगाच्या पाठीवर कोरोना विषाणूने मानवाचे जगणे बदलवून टाकले आहे. लॉकडाऊनने परतीचे दोरचा कापून टाकल्याने अनेक नागरिक घरी पोहचण्यासाठी आकाशाला गवसणी घालण्यासारखे अचंबित साहस करून कुटुंबियांमध्ये पोहचण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अलाहाबादच्या मजुरांनीही नाशिकहून घरी पोहचण्यासाठी पायांच्या चाकाला गती देऊन नाशिक ते अलाहाबाद असे सुमारे १३१४ किमीचे अंतर कापणे सुरू केले आहे. या प्रवासात ठिकठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेमुळेच कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नसल्याची भावना या मजुरांनी व्यक्त केल्या.
मुळचे अलाहाबाद येथील सचिन कुमार, गौतम विजयराज, रामबहादूर आदिवासी, अजितकुमार गौतम, अंकुर, दिनेशकुमार, धर्मराज मजुर नाशिक येथे मागील काही महिन्यांपासून बांधकाम कंपनीत मजुर म्हणून काम करीत आहेत. परंतु कोरोनामुळे कामही बंद झाले व लॉकडाऊनमुळे घरी परतीचे साधनेही. त्यामुळे नाशिक ते अलाहाबाद अंतर पायी गाठण्याचा दिवस कोरोनाने या मजुरांवर आणला. ११ एप्रिलपासून या सातही जणांनी कुटुंबियांच्या ओढीने घराचा मार्ग धरला. आज (दि. १६) रात्री आठ वाजताच्या सुमारास सातही जण शहरात दाखल झाले. अलाहाबादला जाण्याचा मार्गाची त्यांनी शहरवासीयांना विचारपूस केल्याने त्यांची कोरोनामुळे होणारी पायपीट उघडकीस आली. याबाबत सिटी कोतवालीचे पोलिस कॉन्स्टेबल सुभाष पारिसे यांनी त्यांची चौकशी केली. यासोबतच शहरातील अनेक जणांनी त्यांची चौकशी करून मार्गदर्शनही केले. नाशिकपासून अमरावतीपर्यंत लोकांनी त्यांना जेवणही दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.