आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये १३९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा हिवताप विभागाने केली आहे. डेंग्यूबरोबरच ५६ मलेरिया तर ७४ चिकनगुनियाचे रुग्णही आढळून आले आहेत. हिवताप विभागाने दहा महिन्यांमध्ये ४७५ संशयित रुग्णांची तपासणी केली. यामध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटली झाल्याचे हिवताप विभागाने दावा केला आहे.
पावसाळ्यात कीटकजन्य आजरांचे प्रमाण अधिक असते. पावसाळा कमी होताच या आजारांचा प्रादुर्भावही कमी होत असतो. जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु, हिवाळा सुरू होताच आता या रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. गत वर्षी जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ५८२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. तर यंदा जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दहा महिन्यांमध्ये १३९ रुग्ण आढळले. दोन वर्षांनंतर ३८ स्क्रब टायफसचे रुग्ण : जिल्ह्यात दहा महिन्यांमध्ये ३८ स्क्रब टायफसचे रुग्णही जिल्ह्यात आढळून आले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये या आजाराचे एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नव्हता.,असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
जनजागृती मोहिमेचे यश जिल्ह्यात दहा महिन्यांमध्ये १३९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्ण कमी असून, हिवताप विभागाने राबवलेल्या जनजागृती मोहिमेचे हे यश आहे. तसेच स्क्रब टायफसचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, आता दोन्ही कीटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. -डॉ. शरद जोगी, जिल्हा हिवताप अधिकारी,अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.