आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट उपक्रम

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील तिन्ही उड्डाणपुलांवर रोषणाई

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर तिरंगा अभियानासह शहरातील तिन्ही उड्डाण पुल रोषणाईने सजवले जाणार आहेत. अमृत महोत्सव आपल्याला एखाद्या सणाप्रमाणे साजरा करायचा असल्यामुळे शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिन्ही उड्डाणपुल सजवले जातील, अशी माहिती मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

उड्डाण पुलावर रोषणाई करण्याची जबाबदारी लायन्स क्लब, महेफील इन आणि क्रेडईला देण्यात आली आहे. त्यानुसार ते रोशनाई करण्याची नियोजन करतील. मनपाच्या पाचही मार्केटवर रोशनाई करण्यात येणार आहे. चेंबर आॅफ काॅमर्सकडून १० हजार झेंडे, वाईन असोसिएशनकडून १ हजार झेंडे, राजवाडा क्षितीज पॅलेस, तेलई मंगल कार्यालय, जवरकर मंगल कार्यालय गोल्डन लिफकडून १ हजार झेंडे, जेसीआय संघटनेद्वारे १ हजार झेंडे देण्यात येणार आहेत.

३ हजार झेंडे लाॅजिंग अॅण्ड बोर्डींग असोसिएशनकडून दिले जाणार असून शहर रोशनाईने उजळण्यासाठी विविध संघटना पुढाकार घेतील, असेही त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले विद्यापीठाकडून २५ हजार झेंडे : मनपाला विद्यापीठाकडून २५ हजार तिरंगा ध्वज मिळणार आहेत. मनपाचे शहरासाठी ९० हजार ध्वजांचे उद्दीष्ट्य असून त्यापैकी ३० हजार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळाले असून आणखी २० हजार मिळणार आहेत.

शहरातील ऐतिहासिक स्मारकं १३ ते १५ या कालावधीत विद्युत दिव्यांसह रंगीत प्रकाशझोताने उजळणार आहेत. जवाहर गेट, हुतात्मा स्मारक, जयस्तंभ चौक येथे रंगीत प्रकाशझोत तसेच विद्युत रोशनाई महानगरपालिकेद्वारे केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...