आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आदर्श नेहरु नगरमध्ये एका घरात अवैध गॅस रिफिलिंग सुरू असून त्यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याची माहीती पुरवठा विभागाच्या पथकाला मिळाली. त्या आधारे पथकाने गुरुवारी (दि. ४) धाड टाकून १४ सिलिंडर जप्त करुन दोघांविरुद्ध कारवाई केली आहे. याचवेळी एक प्रवाशी ऑटो सुद्धा जप्त केला आहे.
पंकज रामदास तायडे (४४, रा. आदर्श नेहरु नगर) आणि कुलचंद गोविंदराव तायडे (४९, रा. वॉलकट कम्पाउंड, अमरावती) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गुरूवारी पुरवठा विभागाच्या पथकाने पंकज तायडेच्या घरी धाड टाकली. त्यावेळी १२ भरलेले व दोन रिकामे गॅस सिलिंडर मिळून आले. तसेच कुलचंद तायडे यांच्या प्रवाशी ऑटोत घरगुती सिलिंडरमधून गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी पंकज तायडेला या सिलिंडरबाबत विचारणा केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाहीत.
त्यामुळेच पुरवठा विभागाचे निरीक्षक वैभव खैरकर यांनी या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पंकज तायडे व गुलचंद तायडे यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. याचवेळी १४ सिलिंडर, एक प्रवाशी ऑटो व गॅस रिफीलींगसाठी वापरात येणारे दोन टिल्लू पंप असा सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.