आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीईत लॉटरी लागलेल्या जिल्ह्यातील २२१३ पाल्यांपैकी शेवटच्या दिवशी १४८८ प्रवेश निश्चित झालेत. तर ७२५ पालकांनी मात्र, प्रवेशाला नो रिस्पॉन्स दिल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात प्रतीक्षा यादीतील पाल्यांना प्रवेशाकरिता संधी दिली जाईल.
जिल्ह्यात शिक्षण विभागाने २४० शाळांमधील २२५५ रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबवली होती. २२१३ पाल्यांची लॉटरी लागली तर तितक्याच पाल्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. त्यांना प्रवेशाकरिता २० एप्रिलपर्यंची डेडलाइन देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ करून २९ एप्रिलपर्यंत मुदत दिली. मात्र, पाल्यांचे प्रवेश संथगतीने होत असल्याचे शिक्षण विभागाने १० मेपर्यंत प्रवेशाला मुदतवाढ दिली होती. १० मेपर्यंत जिल्ह्यात १४८८ पाल्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत.
यात १९ विद्यार्थी अॅप्रोच झाले नाही तर ७२५ पाल्यांनी प्रवेश केले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात प्रतीक्षा यादीतील पाल्यांना संधी दिली जाणार आहे. प्रवेश झालेल्या पाल्यांमध्ये अचलपूर तालुक्यात ८२ पाल्यांनी प्रवेश निश्चित केले. सोबतच अमरावती ८२, महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ३१९, अंजनगाव सुर्जी २९, भातकुली २, चांदूर बाजार ४५, चांदूर रेल्वे १९, दर्यापूर १६, धामणगाव रेल्वे २४, मोर्शी ३१, नांदगाव खंडेश्वर १६, तिवसा १६, वरूड तालुक्यात आरटीईचे ३४ प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. चिखलदरा, धारणी तालुक्यात एकही प्रवेश झाले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.