आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचा‎ 15 रुग्णांनी घेतला लाभ‎

शेंदुरजनाघाट‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील राष्ट्रीय हत्तीरोग‎ नियंत्रण पथक, महात्मा जोतिबा‎ फुले व आयुष्यमान भारत‎ जनआरोग्य योजने अंतर्गत वरुड‎ येथील ग्रामीण रुग्णालयात हत्तीरोग‎ उप पथकाद्वारे आयोजित‎ शिबिरामध्ये अंडवृद्धी रुग्णांवर‎ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.‎ १५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ‎ घेतला.‎ या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे‎ वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद‎ पोतदार, तालुका आरोग्य अधिकारी‎ डॉ. अमोल देशमुख, डॉ. प्रवीण‎ बिजवे व भूलतज्ज्ञ डॉ. पंकज‎ बिजवे, शिबिर सहायक संचालक‎ डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे,‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‎ दिलीप रणमले, डॉ. प्रशांत घोडाम,‎ जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद‎ जोगी, हत्तीरोग अधिकारी डॉ. जुनेद,‎ सुशील तिवारी उपस्थित होते.

‎ ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. हर्षल भुंबर,‎ डॉ. घनश्याम मानकर, अमरावती‎ येथील राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण‎ पथक येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक‎ अधिकारी प्रवीण चकुले, आरोग्य‎ सहायक सुधाकर चोपकर व‎ आरोग्य कर्मचारी प्रकाश दातीर यांनी‎ शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले.‎ शिबिराला आरोग्य सहायक सुनील‎ वाडीकर, सुधाकर राऊत, अनिल‎ आगरकर, आरोग्य कर्मचारी सचिन‎ घाटे, एस. डब्ल्यू. तायवाडे, आर.‎ वानखडे, डी. वानखडे यांचे विशेष‎ सहकार्य लाभले. वर्षा दरोकर, लता‎ शुक्ला, प्रगती वाट, संदीप पवार,‎ स्वाती पाटील, इंदू धांडे, सागर‎ झटाले, आशिष पापळकर, किशोर‎ मांडळे, राहुल वाडीकर, निरंजन‎ अढवू, अनिता दिग्रस्कर, महात्मा‎ फुले जन व आयुष्यमान भारत जन‎ आरोग्य योजनेतील राजेंद्र सावरकर,‎ दिनेश घ्यार, प्रमोद जिचकार, सर्व‎ अधिकार व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या‎ वैयक्तिक भेटी घेत शिबिराचा‎ समारोप केला. या वेळी रुग्णांना‎ हत्तीरोगाबाबत सविस्तर माहिती‎ देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...