आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील १.२४ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केलेल्या आहेत. यापैकी १५ हजार ५५८ पूर्वसूचना विविध कारणे दर्शवून कंपनीने अपात्र ठरवल्या. या सर्व पूर्व सूचनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तालयाद्वारा विमा कंपनीला देण्यात आले असतानाही अद्याप एकाही पूर्वसूचनेचे सर्वेक्षण कंपनीद्वारा झाले नाही. त्यामुळे कृषी विभागासह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पीक विमा कंपनीने बगल दिली आहे.
सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील किमान तीन लाख हेक्टरमधील पिके बाधित झाली. या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ८४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले.
नुकसानीची पाहणी करून पीकविमा परतावा मिळावा, यासाठी १ लाख २३९८६ पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल झाल्यात. कंपनीद्वारा १०,६५२ पूर्व सूचनांचे सर्वेक्षण या चार महिन्यांच्या काळात केले. अद्याप ३३ हजार ३३४ पूर्व सूचनांचे सर्वेक्षण केले नाही. याशिवाय विविध कारणे दर्शवून १५,५५८ पूर्वसूचना कंपनीद्वारा अपात्र ठरवल्या आहेत. यात ४०९३, तिवसा १५१८ व वरुड ७२ तासांऐवजी दहा दिवसांचा अवधी गृहीत धरावा व या अपात्र पूर्व सूचनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कंपनीचे आदेशच नाहीत
विमा कंपनीचे प्रतिनिधी शासन, प्रशासनाचे नव्हे, तर कंपनीच्याच आदेशाचे पालन करतात, असे वेळोवेळी दिसून आले आहे. जिल्हाधिकारी तसेच कृषी आयुक्तालयाने आदेश दिले असले, तरी कंपनीचे याबाबत आदेश नसल्याने अपात्र सूचनांचे सर्वेक्षण झाले नसल्याची माहिती आहे. कंपनीने १४ तालुक्यांसाठी तीन एजन्सींची नियुक्ती केली आहे.
अपात्र ठरवलेल्या पूर्वसूचना
पीक विमा कंपनीने आतापर्यंत १६ हजार ५५८ पूर्वसूचना अपात्र ठरवल्यात. यामध्ये अचलपूर तालुक्यात ३९६, अमरावती १३५३, अंजनगाव सुर्जी ५६९, भातकुली १४८३, चांदूर रेल्वे १३१३, चांदूर बाजार ३१८, चिखलदरा ११४, दर्यापूर ३८०, धामणगाव रेल्वे १९८७, धारणी ८५, मोर्शी १२७२, तिवसा १५२८, नांदगाव खंडेश्वर ४०९३ व वरुड तालुक्यातील ६७७ पूर्वसूचना आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.