आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीक विमा म्हणजे कृषी विभागाला अवघड जागेचे दुखणे झालेले आहे. खरिपाच्या नुकसान भरपाईत डावललेल्या पाच तालुक्यांतील फक्त २ हजार ३०९ शेतकऱ्यांना १.०६ कोटीची भरपाई कंपनीद्वारा तत्काळ देण्यात आली. परंतु याच तालुक्यातील किमान १५ हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरिपातील पीक ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततच्या पावसाने उद्ध्वस्त झालेले आहे. अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत, यासाठी पीक विमा कंपनीकडे १.२६ लाख शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पूर्वसूचना दाखल केलेल्या आहेत.
त्यापैकी तब्बल २६ हजार ३८४ अर्ज कंपनी स्तरावर नाकारण्यात आले. याशिवाय ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरासरी उत्पादन ५० टक्क्यांनी कमी येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली. यानंतर एका महिन्यात शेतकऱ्यांना सरसकट विमा देणे कंपनीला बंधनकारक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.