आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानदंश:अंजनगावात दोन दिवसांत 16 जणांना श्वानदंश

अंजनगाव सुर्जी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, दोन दिवसात तब्बल १६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात माहिती घेऊन नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून ज्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

कुत्रा चावल्यास त्वरित लस घ्यावी
दोन दिवसात १६ रुग्णांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना प्रतिबंधक लस टोचल्या. शहरातील मोकाट कुत्र्यांवर आळा घालणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. सध्या कुत्र्यांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. ही बाब घातक आहे. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेत. कुत्रा चावल्यास त्वरित प्रतिबंध लस टोचून घ्यावी.
-डॉ. अमोल नालट, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी.

बातम्या आणखी आहेत...