आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गाेवरचे १६ संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच जिल्ह्यात गोवरचा शिरकाव होऊ नये, यासाठी उपाययोजनाही आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत आहे.
लहान बालकांमध्ये होणाऱ्या गोवर अजाराने राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये धुमाकुळ घातला आहे. यामध्ये काही ठिकाणी बालकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. गोवरची साथ थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. अशातच आता जिल्ह्यातही गाेवर संशयीत तापाचे १६ रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून अमरावती १०, अंजनगाव सूर्जी ४, अचलपूर २ या तालुक्यातील हे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
संशयित रुग्णांचे नमुने पाठवले तपासणीसाठी ^जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये आतापर्यंत १६ गोवर संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांचे नमूने हे तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले आहे. सहा, सात दिवसांमध्ये या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईल. डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.
काळजी घेणे गरजेचे गोवर हा एक संक्रमणयुक्त आजार आहे. गोवरमध्ये ताप येणे, शरीरावर चट्टे निर्माण होणे, कानात संक्रमण होणे, हगवण लागणे, न्यूमोनिया असे अनेक आजार देखील उद्भवतात. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.